|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एनआयटी’ शिक्षण संस्थेचा उद्या दिशांत सोहळा

एनआयटी’ शिक्षण संस्थेचा उद्या दिशांत सोहळा 

प्रतिनिधी/ पणजी

 ‘एनआयटी’ या संस्थेचा तिसरा दिक्षांत सोहळा रविवार दि. 3 रोजी 10 वा. फ्ढाsंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित असणार आहेत. एकूण 109 विद्यार्थ्यांना पद्वी प्राप्त होणार आहे. यात 65 बी.टेक विद्यार्थ्यांचा तर 44 एम.टेक विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहेत. यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱया विद्यार्थ्यांना एकूण आठ अशी सुवर्णपदक देवून त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, असे एनआयटी या शिक्षण संस्थेचे संचालक गोपाल मुगेराया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुठल्याही संस्थेची प्रगती ही ट्रेनिंग आणि प्लेसमेंट यांचे उपक्रम स्पष्ट करतात. पदवीपूर्व विद्यार्थ्यांमध्ये 87 टक्के विद्यार्थी मोठय़ा कंपनीत कामाला लागले आहेत. ज्यांचे सरासरी मानधन साडेचार लाख रुपये आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण आणि प्लेसमेंट देण्यात येते.

गेल्यावर्षी ‘युथ एक्सेंज’ उपक्रमाची संधी घेऊन विद्यार्थी जपान, चायना आणि रशिया या देशात गेले होते. यात ईस्ट ऐशिया नेटवर्क ऑफ्ढ एक्सेंज फ्ढाsर स्टुडंट ऍण्ड युथ या उपक्रमांतर्गत ईशान वेर्णेकर हा विद्यार्थी जपानमध्ये गेला होता तर इंडियन युथ डेलिगेशन उपक्रमांतर्गत दहा दिवसांसाठी केविन मोंतेरो गेला होता. इंडियन युथ डेलिगेशन उपक्रमांतर्गत यामिनी प्रीथी कामिशेट्टी यांनी रशियाला भेट दिली होती.

पाच वर्षात नविन कॅम्पस होणार

या संस्थेत विद्यार्थ्यांना मर्यादित सोयी असूनदेखील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल ठरले आहेत. यावर्षी सरकारने 120 ऐकर जमीन संस्थेला दिल्याने 2020 सली या संस्थेचा पॅम्पस तयार होणार आहे. त्यानंतर संशोधन क्षेत्रात नवीन उपक्रमांसाठी सोयी मिळणार आहेत. या संस्थमध्ये देशविदेशातील विद्यार्थी शिक्षण  घेण्यासाठी येत असतात. पण या संस्थेला चांगले कॅम्पस नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. आता केंदीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे सुमारे 1200 करोड रुपये कॅम्पससाठी मिळणार आहे. त्यामुळे येणाऱया पाच वर्षात हे कॅम्पस पूर्ण होणार आहे. यात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुखसोयी उपलब्ध असणार आहे, असेही यावेळी संचालक गोपाल मुगेराया यांनी सांगितले.