|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » गोवा – बोरिवली बसचा अपघात , दोघांचा मृत्यू तर 32 जण जखमी

गोवा – बोरिवली बसचा अपघात , दोघांचा मृत्यू तर 32 जण जखमी 

ऑनलाईन टीम / रत्नागिरी :

रत्नागिरी राजापूर वाटूळजवळ गोवा- मुंबई महामार्गावर खासगी बसला रात्री अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईला परताणाऱया बसच्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत.

गोव्यावरून शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी बसला रत्नागिरीमध्ये अपघात झाला. राजापूरच्या वाटूळजवळ चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका प्रवाशावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गेलेल्या चाकरमान्यांना घेऊन ही बस मुंबईतील बोरीवलीला परतत होती या अपघातात 32 जखमी झाले असून त्यांच्यावर लांज्याच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.

 

Related posts: