एअर इंडियाकडून 50 टक्के सवलत

नवी दिल्ली
एअर इंडियाकडून निवडक श्रेणीतील प्रवाशांसाठी तिकीट दरांमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. विद्यार्थी, सुरक्षा दल आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ही ऑफर सुरू करण्यात आली. कंपनीच्या देशांतर्गत प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर ही सवलत आहे. विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 12 ते 26 वर्षे निर्धारित केली आहे. या ऑफरचा लाभ उठविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. या ऑफरच्या अंतिम मुदतीविषयी कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला 25 किलोपर्यंत सामान नेण्याची अनुमती असेल.
Related posts:
Posted in: उद्योग