|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणातील सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित

चिपळुणातील सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित 

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरातील पाचठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर आणखी चौदाठिकाणी लोकसहभागातून हे कॅमेरे बसवले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी सांगितले.

 गेल्या काही वर्षांपासून घरफोडय़ांसह पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र ज्याठिकाणी चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱयात कैद झाले अशा बहुतांशी चोऱया उघड करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी पोलिसांकडून नगर परिषदेकडे सातत्याने होत होती. मात्र नगर परिषदेने याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे पोलीस दलानेच पुढाकार घेऊन चोऱयांचे गुन्हे उघड करण्यासाठी आपल्याला महत्वाचे ठरत असलेले सीसी टीव्ही कॅमेरे शहरातील बहाद्दूरशेखनाका, फरशीतिठा, चिंचनाका, गोवळकोट कमानी व गणेशखिंड येथे बसवले आहेत. 

  त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने ते कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर लोकसहभागातून आणखी महत्त्वाच्या 14 ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसे झाल्यास चोरटय़ांची येथे नाकाबंदीच होणार आहे. याचबरोबर इमारतीधारकांनीही चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मिसर यांनी केले आहे.

Related posts: