|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 2 लाख कंपन्यांची बँक खाती बंद

2 लाख कंपन्यांची बँक खाती बंद 

काळय़ा पैशाविरोधात कठोर निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नोटाबंदीनंतर 2.09 लाख कंपन्यांची नोंदणी रजिस्टार ऑफ कंपनीजकडून रद्द करण्यात आली आहे. आता या कंपन्यांची बँक खाती बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली. या कंपन्यांचा वापर करचोरी आणि काळय़ा पैशाच्या हस्तांतरणासाठी करण्यात येत असल्याचे सरकारला वाटते. ही बँक खाती कंपन्यांच्या संचालकांना वापरता येणार नाही. बँकांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. सरकारच्या या कारवाईने सदर कंपन्यांतील संचालक आणि अधिकारी हे माजी संचालक आणि माजी अधिकारी बनतील. हे प्रकरण आता राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडून कायद्यानुसार सोडविण्यात येत नाही, तोपर्यंत ही बँक खाती बंद असतील असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सरकारने या कंपन्यांवर कारवाई करण्याचे संकेत जुलै महिन्यात दिले होते. रजिस्टार ऑफ कंपनीजकडून 2,09,032 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या कंपन्यांची खाती बंद करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात यावीत असे अर्थसेवा विभागाकडून सांगण्यात आले. या कंपन्यांबरोबर व्यवहार करताना बँक कर्मचाऱयांकडून कठोरता दाखविण्यात यावी. आर्थिक निवेदन आणि वार्षिक रिटर्न फाईल दाखल करताना गडबड करत आहेत, अशा कंपन्यांच्या व्यवहारावर नजर ठेवण्यात यावी असे कंपन्यांना इशारा देताना बँकांना सांगण्यात आले आहे. सरकारकडून काळय़ा पैशाविरोधात सुरू असणारी मोहीम अधिक कठोर करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Related posts: