|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » Top News » पतंजलीच्या जाहिरातीवर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी

पतंजलीच्या जाहिरातीवर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पतंजली आयुर्वेदच्या एका साबणाच्या जाहिरातीला दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. रॅकिट बेनकीजर या डेटॉलचे उत्पादन करणाऱया कंपनीने याबाबत तक्रार दाखल केली. यावर निकाल देताना न्यायालयाने संबंधित जाहिरात थांबण्याचे आदेश दिले आहेत.

डेटॉल ब्रँडची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. रॅकिट बेनकीजनुसार, जाहिरातीमध्ये असा साबण दाखवण्यात आला आहे, जो आकाराने आणि रंगाने आपल्याच उत्पादनासारखा आहे. तसेच त्याचा उल्लेख ढिटॉल असा करण्यात आला आहे. याशिवाय रसायनयुक्त साबणांचा वापर करु नका आणि नैसर्गिक साबण वापरा, असे या जाहिरातीत म्हटले आहे

Related posts: