|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱयाला कठोर शिक्षा करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱयाला कठोर शिक्षा करा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

अहमदनगर जिह्यातील हातगाव कांबी (ता.शेवगाव) येथे नाभिक समाजातील  अल्पवयीन मुलीवर गावातील व्यक्तीने अत्याचार केले. त्याला तात्काळ कठोर  शिक्षा करावी. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली. गुरुवारी त्यांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.

अहमदनगर जिह्यातील हातगाव कांबी येथे गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीवर गावातील  व्यक्तीने अत्याचार केले. या व्यक्तीला अधिकाधिक कठोर शिक्षा करावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडाळने  केली आहे. गुरुवारी त्यांनी जिह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मूक मोर्चा काढून तेथील तहसीलदारांना याबाबतचे निवेदन दिले. कोल्हापूर शहरातील मोर्चाची सुरुवात दुपारी 12 वाजता दसार चौक येथून झाली. व्हिनस कॉर्नर, उद्योग भवन मार्गे हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर समाजाने एक शिष्टमंडळ करून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब काशीद म्हणाले, ‘नाभिक समाजातील त्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा प्रकार निंदनीय आणि खेदजनक आहे. यातील आरोपी हा गावातील प्रतिष्ठीत कुटुंबातील आहे. त्यामुळे तो हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. 11 सप्टेबरला नगरमध्ये नाभिक समाजाचा भव्य मोर्चा निघणार आहे यामध्ये राज्याभरातून नाभिक समाजातील बांधव, भगिनी सहभागी होतील.’

Related posts: