|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » तरूणीला धावत्या लोकलमधून फेकले ; विरारमधील घटना

तरूणीला धावत्या लोकलमधून फेकले ; विरारमधील घटना 

ऑनलाईन टीम / विरार :

विरारमध्ये 19 वर्षाच्या तरूणीला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना घडली आहे. कोमल चव्हाण असे या तरूणीचे नाव असून ती या घटनेत जखमी झाली आहे.

कोमल चव्हाण गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास कामावरून घरी नालासोपऱयाला जात असताना हा प्रकार घडला.कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. ट्रेन सुरू होताच एक व्यक्ती त्या डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. घाबरलेल्या कोमलने पैसे देण्यास नकार दिला.त्यामुळे त्या व्यक्तीने कोमलला धावत्या ट्रेनमधून ढकलेले आणि स्वत:ही खाली उतरला.कोमलवर सध्या विरारमधील विजय वल्लभ रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तिच्या खांद्याला जबर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

 

Related posts: