|Sunday, April 22, 2018
You are here: Home » Top News » यूपीए आणि एनडीएमुळे देश अधोगतीला : राम जेठमलानी

यूपीए आणि एनडीएमुळे देश अधोगतीला : राम जेठमलानी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तत्कालीन यूपीए आणि विद्यमान एनडीए सरकारने देशाला अधोगतीला नेले आहे, अशी टीका ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केली. तसेच वकीली क्षेत्रातून निवृत्त झालो तरी यापुढे भ्रष्ट राजकीय नेत्यांविरोधात लढाई सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जेठमलानी बोलत होते. ते म्हणाले, देशातील सध्याची परिस्थिती चांगली नाही. तत्कालीन यूपीए आणि आताचे एनडीए सरकारने देशाला अधोगतीला नेले आहे. या मोठय़ा संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी वकील संघटनेतील सदस्य आणि नागरिकांची असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, वकीली व्यवसायातून निवृत्ती घेत असलो तरी यापुढील काळात भ्रष्ट राजकारण्यांशी लढा देणार असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: