|Sunday, September 10, 2017
You are here: Home » Top News » औरंगाबाद हत्याप्रकरण ; पत्नीकडूनच पतीच्या हत्येची सुपारीऔरंगाबाद हत्याप्रकरण ; पत्नीकडूनच पतीच्या हत्येची सुपारी 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या गुन्हे शाखेला चोवीस तासात गुह्याचा छडा लावण्यात यश आले असून, याप्रकरणी मृताची पत्नी भाग्यश्री होळकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दीड महिन्यापासून खुनाचे प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या हत्येसाठी भाग्यश्री हिने 2 लाख रुपये सुपारी देऊन खुनाचा डाव रचला होता. याप्रकरणी कांबी येथून खुनाची सुपारी देणाऱया पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली. 

Related posts: