|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतकऱयांची थकीत बिले व्याजासह द्या

शेतकऱयांची थकीत बिले व्याजासह द्या 

प्रतिनिधी/ सांगली

वसंतदादा कारखान्याकडे थकीत असलेली शेतकऱयांच्या बिलांची रक्कम व्याजासहित मिळणार आहे. याशिवाय निवृत्त कामगारांचे फंड व ग्रॅज्युएटीची रक्कमही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साखर आयुक्तांच्या समोर झालेल्या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील शेतकऱयांची बीले नाव्हेंबर 2017 तर  निवृत्त कामगारांची रक्कम लवकरच देण्याची ग्वाही दिली आहे. साखर आयुक्तांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश ‘वसंतदादा’ व्यवस्थापनाला दिले असल्याची माहिती शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

वसंतदादाकडील शेतकरी व निवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांबाबत साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाल्याचे सांगत कोले म्हणाले, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कार्यकारी संव्चालक श्री दत्त इंडियाचे सरव्यवस्थापक मृत्युंजय शिंदे, शेतकरी संघटनेचे सुनिल फराटे, रावसो दळवी, आरजेडी कोल्हापूर सचिन रावळ उपस्थित होते. या बैठकीत शेतकारी, निवृत्त कामगारांचे फंड व ग्रॅज्युएटी, सभासदांच्या ठेवी, त्यावरील व्याज याबाबत चर्चा झाली. वसंतदादाकडे शेतकऱयांचे 2013-14 च्या हंगामीतील बीले थकीत आहेत. याशिवाय 14-15, 15-16 व 16-17 ची बिलेही उशिरा दिली आहेत. त्यांचे व्याज व थकीत रक्कम नाव्हेंबर 2017 अखेर शेतकऱयांना देण्याचे विशाल पाटील व मृत्युंजय शिंदे यांनी कबूल केले असल्याचे सांगत कोले म्हणाले, सभासदांच्या ठेवी व त्यावरील व्याजाची संपूर्ण माहिती घेण्याचे आदेशही साखर आयुक्तांनी आरजेडी सचिन रावळ यांना दिले आहेत.

बैठकीत निवृत्त कामगारांची देण्याबाबत संघटनेच्या कामगार आघाडी प्रमुख मोहन परमणे यांनी आवाज उठवल्याचे सांगत कोले म्हणाले, ज्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युएटीबाबत न्यायालयात निकाल लागला आहे. त्यांना तातडीने ग्रॅज्युएटीची रक्कम देण्याचेही आदेशही कडू-पाटील यांनी दिले आहेत. याशिवाय निवृत्त कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी देण्यासही अध्यक्ष विशाल पाटील यांनी आयुक्तांच्यासमोर सहमती दर्शवली आहे. याबाबत आरजेडी रावळ यांना कामगार आयुक्त कोल्हापूर येथे जावून माहिती घेण्याच्या सूचनाही दिल्याचे कोले यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सुनिल फराटे, रावसो दळवी, शंकर कापसे, वसंतराव सुतार, मोहन परमणे उपस्थित होते.

Related posts: