|Thursday, May 23, 2019
You are here: Home » leadingnews » खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 1 टक्क्याने वाढ

खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 1 टक्क्याने वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, हा भत्ता 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे.

महागाईमध्ये वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱयांच्या मूळ वेतन आणि भविष्य निर्वाह निधीवर 1 टक्का भत्ता वाढवण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील अतिरिक्त वाढ आज करण्यात आली आहे. यापूर्वी 4 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता देण्यात येत होता. त्यानंतर आता यात 1 टक्क्यांनी वाढ झाल्याने महागाई भत्ता 5 टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्त्याची ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

Related posts: