|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रकल्प लोकांच्या माथी मारू नका!

प्रकल्प लोकांच्या माथी मारू नका! 

खासदार राऊत, आमदार साळवी यांची भूमिका

वार्ताहर /राजापूर

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी हा प्रकल्प लोकांच्या माथी मारू नका, जनतेच्या भावना विचारात घ्या, असे ठामपणे सांगितले.

या बैठकीतही राऊत व साळवी यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडली. 9 सप्टेंबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार यांनी विराट मोर्चा काढून प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. ही बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रिफायनरी प्रकल्प जर प्रदुषणविरहित असेल तर ग्रीन रिफायनरीच्या तीनही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्थानिक जनतेला ते पटवून द्यावे, असे साळवी यांनी सांगितले. तर राऊत यांनी पुनर्वसनाबाबतचा विषय उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकांचा विचार घेऊनच या प्रकल्पाबाबत पुढचे पाऊल टाकले जाईल, असे सांगितले.

प्रकल्पग्रस्तांना आश्वासनांचे भरगच्च पॅकेज!

रिफायनरी प्रकल्प बैठक

पाच गावांचे आदर्श पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांश मागण्या मान्य -सुभाष देसाई

सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी करणार ग्रामस्थांशी चर्चा

प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देणार

प्रतिनिधी /मुंबई

ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन देणाऱया शेतकऱयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई, प्रकल्पामुळे बाधित होणाऱया 14 पैकी पाच गावांचे आदर्श पुनर्वसन, स्थानिक तरूणांना नोकरीत संधी मिळावी म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात कौशल्य विकास योजना असे भरभक्कम पॅकेजचे आश्वासन मिळाल्यानंतर स्थानिक गावकरी तसेच शिवसेनेचा ग्रीन रिफायनरीला असलेला विरोध मंगळवारी जवळपास मावळला.

ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. संपूर्ण प्रकल्प हा पर्यावरणपूरक राहील. खाडीत प्रकल्पाचे प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही किंवा वातावरणात धूर सोडण्यात येणार नाही. प्रदूषणकारी घटक जाळण्याऐवजी त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणाला कोणतीही हानी पोचणार नाही, अशी ग्वाही पेट्रोलियम कंपन्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केल्याची माहिती शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीला स्थानिक गावकऱयांनी विरोध दर्शवला आहे. ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प विनाशकारी असल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी गावकऱयांची मागणी आहे. गावकऱयांनी रस्त्यावर उतरत प्रकल्पाविरोधातील आवाज बुलंद केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सुभाष देसाई, रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, राजन साळवी, प्रमोद जठार, 14 गावांतील प्रतिनिधी, सरकार तसेच पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांश मागण्या संमत झाल्या आहेत. आता शिवसेना-भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकार आणि कंपन्यांचे अधिकारी नाणार परिसरात जाऊन शेतकरी, मच्छीमार यांच्याशी चर्चा करून सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती देतील, असे देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिफायनरीला कुशल मनुष्यबळ लागणार आहे. हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी कंपन्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आयटीआय संस्था दत्तक घ्याव्यात. या संस्थांमधून तरूणांना योग्य प्रशिक्षण द्यावे, नवे अभ्यासक्रम सुरू करावेत याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे देसाई म्हणाले.

प्रकल्पामुळे बाधित होणाऱया पाच गावांचे आदर्श असे पुनर्वसन केले जाईल. उर्वरित 9 गावे अंशतः बाधित होणार असून त्यांचे गरजेप्रमाणे पुनर्वसन होईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या जातील, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

ग्रीन रिफायनरीविषयी…..

कोकणात होऊ घातलेला देशातील आतापर्यंतचा सर्वात विशाल प्रकल्प

भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कंपन्या एकत्र येणार

प्रकल्पासाठी तीनही ऑईल कंपन्या एकत्र येऊन कॉर्पोरेशन स्थापन करणार

दोन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणि दोन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार

‘स्थानिकांच्या मागण्या आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होतात की नाही यावर आम्ही लक्ष ठेवून राहू. गावकऱयांच्या अन्य योग्य मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा केला जाईल’

सुभाष देसाई/उद्योगमंत्री

‘ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींचे समाधान झाले असेल तर प्रकल्पाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. यासंदर्भात गरज भासल्यास पक्षप्रमुखांशी मी चर्चा करेन’

रामदास कदम./पर्यावरणमंत्री

Related posts: