|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सिव्हिल रस्त्यावर पाईप लाईनला गळती

सिव्हिल रस्त्यावर पाईप लाईनला गळती 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील सिव्हिल रोडला खड्डा पडला असून दोन-तीन दिवस झाले, त्या खड्डया खालील पाईपलाईन फुटली आहे व तिथून पाण्याची गळती सुरू झाली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

  सदर बाझार परिसरात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल रोडला चौकात खड्डा पडलेला असून त्या खड्डय़ात दोन चाकी व चार चाकी गाडय़ा भरधाव वेगाने जातात. ज्यामुळे या खड्डयातील माती, दगड, डांबर रस्त्यावर येवून पडले आहे. वारंवार गाडया जाण्यामुळे हा खड्डा मोठा व खोल झाला असून त्याखालून पाण्याची पाईप लाईन गेली आहे. हया पाईप लाईनला धक्का बसल्याने सुरूवातीला पाईपला चिर गेली आणि थोडया प्रमाणावर पाणी वाहु लागले. नंतर दोन दिवस वाहनांचा ये-जा वाढल्याने पाईप लाईनमधून जास्त प्रमाणात पाणी वाहु लागले असून हया पाण्यामुळे रस्त्यावर असणारे दुसरे खड्डे भरून वाहत आहेत. ज्यामुळे रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे. येथील परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करून ही पाईप लाईनची दुरूस्ती केली गेली नाही.

 

Related posts: