|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कपिलेश्वर रोड उड्डाणपुलाशेजारी साचले पावसाचे पाणी

कपिलेश्वर रोड उड्डाणपुलाशेजारी साचले पावसाचे पाणी 

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात वळीव पावसाचा वर्षाव होत असून मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी  कपिलेश्वर रोड येथील उड्डाणपुलाशेजारी शनिमंदिर परिसरात पाणी साचले. तसेच येथील काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. यामुळे येथील उड्डाणपुलाची उभारणी झाली असली तरी येथील रहिवाशांच्या समस्यांचे निवारण झाले नाही. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

कपिलेश्वर रोड परिसरातील सर्व्हिस रस्त्याचा तिढा अद्यापही सुटला नाही. येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता करण्यात आला नसल्याने पादचाऱयांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. तसेच सांडपाणी वाहण्यासाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याने मंगळवारी झालेल्या पावसामुळे अडचणांचा सामना करावा लागला. विशेषत: रस्ता करण्यासाठी अतिक्रमण हटवून घेतलेल्या नागरिकांनाच सांडपाण्याचा फटका बसला आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने अडचण निर्माण झाली नाही. मात्र वळीव पावसाच्या माऱयामुळे पाण्याचा निचरा होण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे येथील समस्यांचे निवारण केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

          जेड गल्ली येथील घराची भिंत कोसळली

पावसाचा फटका काही नागरिकांच्या घरांना बसला आहे. या पावसामुळे जेड गल्ली, काकेरू चौक, शहापूर येथील घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सदस्य बाजूच्या खोलीत असल्याने अनर्थ घडला नाही. येथील रहिवासी रुक्साना मंतुर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. कौलारू व पत्र्याच्या घराची भिंत पडून छताचा काही भाग कोसळला. यामुळे घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.   

Related posts: