|Wednesday, September 13, 2017
You are here: Home » leadingnews » जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे भारतात आगमन ; मोदी-आबे गळाभेटजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे भारतात आगमन ; मोदी-आबे गळाभेट 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आज भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अहमदाबाद विमानतळावर स्वागत केले. आबे यांची त्यांनी गळाभेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी रोड शो केला.

देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जाणार आहे. शिंजो आबे हे मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे गुरुवारी भूमिपूजन करणार आहेत. या मोठय़ा महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जपानकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1.8 लाख कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच या प्रकल्पाशिवाय इतर दहा करारांवरही मोदी-आबे भेटीत स्वाक्षऱया होणार आहेत.

Related posts: