|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत : सीबीएसई

शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत : सीबीएसई 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जावेत, याशिवाय कर्मचाऱयांची पोलीस पडताळणी करविली जावी आणि शाळेत बाहेरील लोकांच्या प्रवेशावर नियंत्रण आणले जावे असे सीबीएसईने अधिसूचनेत नमूद केले. गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये मागील शुक्रवारी 7 वर्षीय प्रद्युम्नची हत्या झाली होती. या घटनेनंतर शाळांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले.

मार्गदर्शक तत्वांच्या निर्धारणासाठी बुधवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी, सीबीएसई अध्यक्ष यांचा समावेश होता. शाळेतील बिगरशिक्षक कर्मचाऱयांमध्ये महिलांचा भरणा अधिक असावा अशी सूचनाही बैठकीत झाली. तसेच वेळोवेळी सुरक्षा विषयक तपासणी शाळा व्यवस्थापनाकडून व्हावी असे बैठकीत सुचविण्यात आले.