|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » आठवडय़ाभरात भारनियमन बंद : बावनकुळे

आठवडय़ाभरात भारनियमन बंद : बावनकुळे 

ऑनलाईन टीम / नंदुरबार :

कोळश्याची तूट भरुन काढण्यासाठी बाहेरुन कोळसा खरेदी करण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला असून, जलविद्युत केंद्रही सुरु झाल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे लवकरच भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

नंदुरबार येथील एका कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, कोळश्याची तूट भरुन काढण्यासाठी बाहेरुन कोळसा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रही सुरु झाल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. आणखी आठवडाभरच नागरिकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर नियमित वीजपुरवठा होईल असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले

Related posts: