|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी आवश्यक

इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी आवश्यक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

‘स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य महिलांचे मोठे योगदान आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे इतिहासाचे विद्रुपीकरण करून इतिहासाचे चुकीचे अवलोकन केले आहे. हा सामाजिक द्रोह थांबवायचा असेल तर इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याची गरज आहे,’ असे मत मुंबई विद्यापीठाचे डॉ. नारायण भोसले यांनी व्यक्त केले.

पेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इतिहास विभाग व नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरीकल रीसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍड. नानासाहेब माने अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भोसले म्हणाले, “ब्रिटीश साम्राज्यवादातून देशात राष्ट्रवादाची संकल्पना रुजली. प्रखर राष्ट्रवादाने प्रेरित होऊन अनेक सर्वसामान्य महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांशी लढा दिला.’’ शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाचे डॉ. अवनीश पाटील म्हणाले, “पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना दुय्यम स्थान मिळाले आहे. विकासाच्या प्रवाहात महिलांच्या जाणिवा दडपून टाकण्याचा प्रयत्न पुरुषांच्या वर्चस्वामधून झाला. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे योगदान समोर आले नाही.’’ शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास  विभागप्रमुख डॉ. अरुण भोसले म्हणाले, “1975 ते 1985 हे दशक युनोने महिला दशक म्हणून साजरे केले. त्यामुळे स्त्राrवादी इतिहास लेखनाला गती मिळाली आहे. या चर्चासत्रात अनेक प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.’’

चर्चासत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाच्या माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. जी. नेजदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉ. रणजित माने यांनी केले. आभार डॉ. हाजी नदाफ यांनी मानले. डॉ. बी. एस. कांबळे, डॉ. शुभांगी भोसले, प्रा. किरण कानडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. सुजाता माने, प्रा. प्रमिला माने, जी. बी. कांबळे, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते..

Related posts: