|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Airtel TV इन्स्टॉल केल्यास एअरटेलकडून 60 जीबी डाटा फ्री

Airtel TV इन्स्टॉल केल्यास एअरटेलकडून 60 जीबी डाटा फ्री 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने खास आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर लाँच केली आहे. या नव्या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री 60 जीबी डाटा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Airtel TV इन्स्टॉल करणे अनिवार्य असणार आहे.

सध्या अनेक मोबाईल कंपन्या अत्यल्प दरात मोबाईल डाटा परवत आहेत. त्यानंतर आता एअरटेलकडून फ्री डाटाची ऑफर लाँच करण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Airtel TV इन्स्टॉल करावा लागणार आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना फ्री डाटाचा बेनफिट 24 तासानंतर मिळणार आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत 10 जीबी डाटा देण्यात येणार आहे. याप्रमाणे 60 जीबी डाटाचा लाभ घेता येणार आहे.