|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » आम्ही अल्टिमेटच : मुख्यमंत्री

आम्ही अल्टिमेटच : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आम्ही अल्टिमेटच आहोत, शिवसेनेने याचा जो अर्थ लावायला तो लावू दे, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी दिली.

राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत आज पार पडली. या बैठकीला भाजपसह शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. सेनेचे कोणतेही मंत्री या बैठकीत आप्रमक दिसले नाही. सर्वच जण शांत होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना सेनेच्या अल्टिमेटमबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मला बोलायची गरज नाही. आम्ही अल्टिमेटच आहोत. सेनेला जो अर्थ घ्यायचा तो घेवू दे’’. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Related posts: