|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट 

नवी दिल्ली

 तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. दोघांची भेट जवळपास 20 मिनिटांपर्यंत चालली. या भेटीत गृहमंत्र्यांना तामिळनाडूत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींची माहिती राव यांनी दिली. सोमवारी तामिळनाडू विधानसभा सभापतींनी अण्णाद्रमुकच्या दिनाकरन गटाच्या आमदारांना अपात्र घोषित केले. पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत या आमदारांवर ही कारवाई करण्यात आली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र दिनाकरन गटाच्या आमदारांनी राज्यपालांना दिले होते. तसेच या आमदारांनी पलानीसामी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललितांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्यानंतर राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार आहे.