|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » पक्षहित डोळय़ासमोर ठेऊनच राणेंबाबतचा निर्णय : गिरीष बापट

पक्षहित डोळय़ासमोर ठेऊनच राणेंबाबतचा निर्णय : गिरीष बापट 

पुणे/ प्रतिनिधी :

पक्षाची कोअर कमिटी मुख्यमंत्री व संघटनमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून, राणे यांच्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यास पक्ष व पक्षनेतृत्व सक्षम असून, बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री व संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बापट यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

पुण्यातील कार्यक्रमानंतर बापट पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या कोअर कमिटीत राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, बापट यांनी त्यांच्या वक्तव्याला छेद दिला. ते म्हणाले, कोअर कमिटीचे नेतृत्व मुख्यमंत्री व संघटनमंत्री करीत असतात. त्यात राणे यांच्याबाबत चर्चा करू. पक्षाचे नेतृत्व परिपक्व आहे. पक्षहिताचा विचार करूनच पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Related posts: