|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्यात स्वाईन फ्ल्यूचे संशयित 874 रुग्ण

जिह्यात स्वाईन फ्ल्यूचे संशयित 874 रुग्ण 

प्रतिनिधी/ सातारा

स्वाईन फ्ल्यू हा आजार जिह्यात ग्रामीण भागातही पसरत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागते. रुग्णालयात मात्र वेगळीच परिस्थिती असून उपचार होण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्याचीच भिती नातेवाईकांना वाटते. त्यामुळे जिह्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या संशयित म्हणून 874 रुग्ण आहेत. तर 26 रुग्णांना या आजाराने बळी घेतला आहे.

सातारा जिह्यात गेल्या दोन वर्षापासून स्वाईन फ्ल्यू या आजार उद्भवल्याचे प्रथम निदर्शनास आले. त्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट झाला. तात्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी त्यावर तशा उपाययोजना काय करता येतील त्याचे नियोजन केले. यावर्षी हा आजार सातारा जिह्यातील ग्रामीण भागात  संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागते. रुग्णालयात मात्र वेगळेच सोयीसुविधा नसल्याने व एकाच वॉर्डमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या संशयित आणि सर्वसामान्य रुग्णही उपचार घेत आहेत. त्यामुळे तसेच जिह्यातील ग्रामीण रुग्णालयातही तीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. संशयित रुग्ण 874 असून स्वाईन फ्ल्यू रुग्ण आहेत. स्वाईन फ्ल्यूचे निदान झालेले 105 रुग्ण तर सध्या ऍडमिट झालेले 25 रुग्ण अपचार झालेत आहेत. त्यापैकी 18 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिह्यातील 18 जणांचा तर जिह्याबाहेरील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. संशयितांच्या स्त्रावाचे नमूने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे, हाफकीन संसोधन संस्था पुणे, कस्तुरबा रुग्णालय मुंबई, एस.आर.एल. लॅब, डॉ. लाल पॅथालॉजी लॅब, स्क्रिनींक सेंटर्स जिह्यात 71 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. असे असले तरीही रुग्णालये मात्र खचाखच भरलेली आहेत, अशी सध्या अवस्था बनली आहे.

 

Related posts: