|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फुटीरवादी शब्बीरला हाफीज सईदकडून मदत

फुटीरवादी शब्बीरला हाफीज सईदकडून मदत 

ईडीचे दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काश्मीरमधील फुटीरवादी नेता शब्बीर शहा हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक, जमात-उद-दावाचा म्होरक्या, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या संपर्कात होता. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी त्याला हवालाच्या माध्यमातून सईदकडून आर्थिक मदतही मिळत होती, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी दिल्ली न्यायालयात  दाखल केलेल्या दोषारोपापत्रात स्पष्ट केले आहे.

ईडीने दोषारोपपत्रात म्हटले आहे की, शब्बीरच्या वतीने हवाला व्यवहाराचे पैसे स्वीकारल्याची कबुली हवाला एजंट मोहम्मद अस्लम वाणी याने दिली होती. शहा याने 2.25 कोटी कोटी त्याच्याकडे दिले होते. शब्बीरला हे पैसे पाकिस्तानमधील हवाला एजंट शफी शायर देत होता. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी हाफीज सईद शब्बीरला पैसे देत होता. हे पैसे तो स्थानिक नागरिकांसह त्याच्या निकटवर्तींना देत होता. हाफी सईदकडून त्याला वर्षाला दहा लाख रुपये मिळत होते. शब्बीरची पत्नी डॉ. बिल्किस ही हवालाच्या माध्यमातून पैसे घेण्यात सहभागी होती. आपण हाफीज सईदच्या संपर्कात होतो, अशी कुबली शब्बीर याने दिली असल्याचेही दोषारोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात शब्बीरसह त्याची पत्नी डॉ. बिल्किस, हवाला एजंट असलम वाणी यांची नावे आहेत.

हाफीज सईदच्या संपर्कात होतो…

दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याप्रकरणी 24 जुलै रोजी सात फुटीरवादी नेत्यांना राष्ट्रीय सुरक्षा संस्थने (एनआयए) अटक केली होती. ईडीने हवालाप्रकरणी शब्बीरला 25 जुलैला तर वाणीस 6 ऑगस्टला अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हाफीज सईद याच्याशी जानेवारी महिन्यात फोनवरून संभाषण झाले होते. मी त्याच्या संपर्कात होतो, अशी कबुली ईडीच्या चौकशीवेळी शब्बीर याने दिली आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत फुटीरवादी नेते पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची कबुली देत नव्हते. शब्बीर याने प्रथम कबुली दिल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related posts: