|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन सीमेचा दौरा करणार गृहमंत्री राजनाथ सिंग

चीन सीमेचा दौरा करणार गृहमंत्री राजनाथ सिंग 

नवी दिल्ली :

 गृहमंत्री राजनाथ सिंग चालू आठवडय़ात उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेचा दौरा करतील, या सीमेवर अलिकडेच शेजारी देशाच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी केली होती. बाराहोती दौऱयादरम्यान सिंग हे आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधतील. आयटीबीपी हे सुरक्षा दल 14311 फूटाच्या उंचीवर स्थित चौक्यांची देखभाल करते. डोकलाम वाद निवळल्यानंतर मोदी सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ मंत्र्यांचा चीन सीमेवरील हा पहिलाच दौरा आहे. सिंग 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया दौऱयात रिमखिम (12500 फूटांची उंची), माना (10500 फूटांची उंची) आणि औली (10200 फूटांची उंची) येथील आयटीबीपीच्या चौक्यांना भेट देतील असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 25 जुलै रोजी चिनी सैनिक बाराहोतीमध्ये 800 मीटरपर्यंत भारतीय हद्दीत शिरल्याचे वृत्त होते. हा भाग उत्तराखंडच्या चमोली जिह्यातील आहे.