|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मुलीच्या जन्मानंतर सहाव्या मिनिटात आधार कार्ड तयार

मुलीच्या जन्मानंतर सहाव्या मिनिटात आधार कार्ड तयार 

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :

आजकाल आधार कार्ड अनेक गोष्टींसाठी बंधकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्डचे महत्त्व वाढत चालले आहे. ही गोष्ट लक्षात घेता उस्मानाबाद मध्ये नवजात बालकाच्या जन्मानंतर सहाव्या मिनिटात आधार कार्ड काढण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिह्यातील रूग्णालयात जन्मलेल्या मुलीला अवघ्या सहाव्या मिनिटात आधार क्रमांक मिळाला. भावना संतोष जाधव असे या मुलीचे नाव आहे. जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवण्याचा विक्रम भावना जाधव हिच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी मध्य प्रदेशातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्मानंतर अवघ्या 22व्या मिनिटात आधार क्रमांक मिळाला होता. मात्र् ा झाबुवामधील या मुलीचा विक्रम उस्मानाबदमधील भावना जाधवने मोडीत काढला आहे.