|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱयावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱयावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱयावर जात आहेत. पहिल्याच दिवशी ह्योसंग केमिकल्स ,सॅमसंग, हुंयदाई आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स आदि उद्योग समुहांच्या प्रतिनिधींसोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

मुख्यमंत्री यावेळी महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते कोरियाच्या उद्योजकांशी चर्चा करतील. राज्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीसह परकीय गुंतवणुकीबाबत बैठका होतील. शिष्टमंडळात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी , एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथ व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदींचा समावेश आहे.

 

Related posts: