|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल नियोजित वेळेत लावण्यात अपयशी ठरलेले कुलगुरु संजय देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. तसेच त्यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

संजय देशमुख यांनी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यास विलंब केला. निकालाबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून वेळोवेळी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, अद्यापही निकाल लावण्यास यश आले नाही. असे असताना संजय देशमुख अचानक रजेवर गेले होते. त्यानंतर रविवारी देशमुखांनी विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सेवेत पुन्हा रुजू होण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राज्यपालांकडून देशमुखांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: