|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘एडीबी’कडून भारताच्या विकास दर अनुमानात कपात

‘एडीबी’कडून भारताच्या विकास दर अनुमानात कपात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई विकास बँकेने (एबीडी) भारताच्या विकास दर अंदाजात बदल केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7 टक्के राहील असे म्हटले. पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजातही कपात केली.

बँकेने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या केलेल्या अनुमानात 7.4 टक्के विकास दर राहील असे म्हटले होते. मात्र आता नव्या अंदाजात तो 0.4 टक्क्याने कमी करण्यात आला. याव्यतिरिक्त 2018-19 चा विकास दर 7.6 टक्क्यांवरून 7.4 टक्के केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतरही देशाची आर्थिक क्षमता मजबूत आहे. या दोघांमुळे अल्प काळासाठी समस्या उद्भवली असून मध्यम काळाने त्याचे लाभ पहावयास मिळतील असे अहवालात म्हटले. आंतरराष्ट्रीय व्यापारातून उभारी, मोठय़ा उद्योगांचे विस्तारीकरण आणि चीनच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याने आशियाई देशांना त्याचा लाभ होणार आहे. पुढील दोन वर्षांपर्यंत या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत होईल, असे म्हणण्यात आले.