|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेकडून युद्धाची घोषणा : उत्तर कोरिया

अमेरिकेकडून युद्धाची घोषणा : उत्तर कोरिया 

प्योंगयांग

 उत्तर कोरियाने अमेरिकेवर युद्धाची घोषणा केल्याचा आरोप केला. स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल कारवाईस तयार असल्याचे वक्तव्य उत्तर कोरियाने पेले. कोरियन उपखंडात अमेरिकेकडून बॉम्बवर्षक विमानांच्या तैनातीनंतर उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱयावरील सुरक्षेत वाढ केली. अमेरिकेची विमाने कोठेही पाडविण्यास सक्षम असल्याची दर्पोक्ती उत्तर कोरियाने केली. तर दुसरीकडे अमेरिकेने उत्तर कोरियाचा आरोप निराधार असल्याचे म्हटले. उत्तर कोरियाचे विदेशमंत्री री योंग हो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धाच्या घोषणेचा आरोप केला होता. उत्तर कोरिया युद्धाच्या स्थितीत अमेरिकेच्या बॉम्बवर्षक विमानाला स्वतःच्या हद्दीत ते शिरले नसले तरीही पाडवू शकते असा दावाही योंग यांनी केला.