|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यात पोलिस आणि सुरक्षा विषय प्रदर्शन भरवणार

सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यात पोलिस आणि सुरक्षा विषय प्रदर्शन भरवणार 

प्रतिनिधी/ सातारा

पंतप्रधानांनी  संपूर्ण  देशात डिजीटल क्रांतीची घोषणा केली. त्या अनुसरुनच पोलिसांच्या यंत्रणांचे अत्याधुनिकीकरण होत असून या प्रदश्रनाच्या माध्यमातून आम्ही टाकत असलेली नवनवीन पाऊले तुम्हाला कळतील, अशा पद्रर्शनातून सामन्यांना सुरक्षा विषयक बाबींचे आकलन आणि संरक्षण विषयक कायदे माहिती होतील हाच या प्रदर्शनाचा उद्देश असून आम्ही हे प्रदर्शन तालुकास्तरापर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील  यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण सायंन्स कॉलेज मधील तंत्रज्ञान विषयक मेळाव्यामध्ये पोलीस दलामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाया तंत्रज्ञान सुविधांबाबतच्या प्रदर्शनास श्री. नांगरे पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील,   जिल्हा पोलिस अधिक्षक  संदीप पाटील, अतिरिक्त पोलीसअधिक्षक विजय पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, होम डि.वाय.एस.पी राजलक्ष्मी शिवणकर आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनात राज्याच्या पोलिसांकडे नाही पण सातारा पोलिसांकडे काही सॉफ्टवेअर आहेत जसे  क्राउड मैनेजमेंड हे सॉफ्टवेअर भारती विद्यापीठ अभियांत्रिकी कॉलेज कराड येथील प्रा. डॉ. हनुमंत रेणुसे यांनी संशोधीत केले आहे. त्याचा डेमो येथे आहे. मिसींग लोकांचा एक वेगळा कक्ष केला आहे. पासपोर्ट , एटीएम गुन्हेगारी निर्बंध , बॉंब विरोधी पथकाचे काम कसे असते …… बॉंब ठेवलेल्या जागेचा  शोध आणि बॉंब नष्ट कसा केला जातो ….. याचे अत्याधुनिक उपकरणासह माहिती दिली जाते.

फॉरेन्सिक ही एक अतिशय महत्वाची शाखा पोलिस विभागात असते …ही शाखा आता विकसीत होत आहे. फॉरेन्सिक चे देशभरात मोजकेच प्रशिक्षण देणाया  संस्था आहेत. त्यातील एक सातायातील वायसी कॉलेज मध्ये आहे. त्या विभागाच्या प्रमुख प्रा. अपर्णा या अहमदाबाद वरुन फॉरेन्सिक पदव्यूत्तर पदवी झालेल्या आहेत. त्यांचाही स्टॉल येथे फॉरेन्सिक बाबत अतिशय अद्यावत माहिती सांगणारा आहे. एकूणच हे प्रदर्शन सर्व सामान्य नागरिकांनी मुद्दामहून बघण्यासारखे आहे.