|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान

वादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान 

पंढरपूर / वार्ताहर

वादळी वारयासह आलेल्या पावसाने तुंगत (ता.पंढरपूर) मधील केळी, द्राक्षे,ऊस, मका यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

     सायंकाळी पाच च्या दरम्यान आलेल्या पावसाने तुंगत च्या भागातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. हाताशी आलेले केळी चे पीक पुर्णपण जमिनोदोस्त झाले आहे. जवळपास गावात 20 एकराच्या आसपास केळी असुन 60 लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. त्यामुळे सलग दोन वर्षापासुन पडणारा दुष्काळ व आत्ताच हाताशी आलेली पिके पावसाने पडली असुन यामुळे शेतकरी वर्गांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच या भागामध्ये ऊसाचे प्रमाण सुध्दा जास्त आहे. 1 नोव्हेंबर पासुन साखर कारखाने सुरू होणार आहेत. ऊस कारखान्यास काही कालावधीच उरला आहे. ऊसाची वाढ झाल्यामुळे सध्या या वारयामुळे ऊस सुध्दा पडला आहे. त्यामुळे ऊसाचे कारखान्याला जाईपर्यंत नुकसान होणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी लवकर लवकर कारखाने सुरू करावेत अशी मागणी शेतकरी वर्गांतुन केली जात आहे.

      तसेच या भागामध्ये मका सुध्दा मोठया प्रमाणात लावली जाते. मका सुध्दा जमिनोदोस्त झाली आहे. त्यामुळे तलाठी यांच्या कडुन पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. पिकांची नुकसान किती झाली आहे यांचे पंचनामे लवकरात लवकर करुन तात्काळ शासनाची मदत शेतकरी वर्गांस मिळावी.

 

चौकटित –

काही दिवसांनी केळी तोडुन बाजारपेठेत पाठवणार होतो चार पैशे मिळणार होते ते पण वादळी वारयाने येणारया पावसात वाहुन गेल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी हीच अपेक्षा आमची आहे.

Related posts: