|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » सरकारने मस्तीत वागू नये : अजित पवार

सरकारने मस्तीत वागू नये : अजित पवार 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

भाजप सरकार ज्या वेगाने सत्तेत आले त्याच वेगाने कोसळेल,तसेच सरकारने मसतीत वागू नये जणता ही मस्ती उतरवू शकते, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. गुरूवारी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

सरकारची धोरणे ही केवळ उद्योगपतींचे भले करणारी आहेत. शेतकऱयाला बोगस म्हणणारे सरकारधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकते, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल पवारांनी यावेळी केला. सरकारने मस्तीत वागू नये, जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही.यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार पर्यंत राजकारणाची संस्कृती जोपासली. आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.