|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » सत्राच्या अखेरीस सावरला बाजार, सेन्सेक्स 123 अंक वधारला

सत्राच्या अखेरीस सावरला बाजार, सेन्सेक्स 123 अंक वधारला 

मुंबई / वृत्तसंस्था :

वायदेसमाप्तीच्या दिवशी बाजारात तीव्र चढ-उतारासहीत कारभार झाले. दिवसभराच्या सत्रात निफ्टीने 9687.55 चा तळ गाठला. तर सेन्सेक्स 31,081.83 अंकांपर्यंत घसरला होता. मात्र सत्राच्या शेवटी जोरदार खरेदी झाली. त्यामुळे परतलेल्या तेजीच्या वातावरणात निफ्टीने 9789.2 अंकांपर्यंत तर सेन्सेक्सने 31,341 अंकांचा उच्चांक गाठला.

सेन्सेक्स 123 अंक (0.4 टक्के) वधारत 31,282.5 च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 33 अंकांच्या नाममात्र (0.3) मजबुतीसह 9,769 वर स्थिरावला.

दिवसाअखेरीस झालेल्या खरेदीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांत तेजी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत 15,309 अंकांवर बंद झाला. तो आजच्या सत्रात 15130 अंकांपर्यंत घसरला  होता. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 अंकाच्या तेजीसह 17950 अंकांवर स्थिरावला. तर बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्याच्या मजबुतीसह 15940 वर बंद झाला.

बँकिंग, वाहन, एफएमसीजी, धातू, औषधनिर्माण आणि बांधकाम समभागांत झालेल्या खरेदीमुळे बाजार सावरला. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी मजबूत होत 24000 च्या वर स्थिरावला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.4 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्के तर धातू आणि फार्मा निर्देशांक अनुक्रमे 0.7 आणि 0.8 अंकानी वधारले. माहिती तंत्रज्ञान, मीडिया, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल व नैसर्गिक वायू समभागांत विक्रीचा दबाव दिसून आला.

दिग्गज समभागांची कामगिरी

सिप्ला, मारुती सुजुकी, भारती इन्फ्रा, कोटक महिन्द्रा, कोल इंडिया, डॉ रेड्डीज आणि एसीसी हे समभाग 2 ते 3.5 टक्के वधारत बंद झाले. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, विप्रो, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज, अरविंदो फार्मा, बॉश, एशियन पेंन्ट्स हे समभाग 0.7 ते 2.6 टक्क्यांपर्यंत घसरले. मिडकॅप  जेएसडब्ल्यू एनर्जी, बजाज होल्डिंग्स, कंटेनर कॉर्प, अशोक लेलॅन्ड आणि युनायटेड ब्रुअरीज हे समभाग 3.5 ते 5.9 टक्के वधारले. तर भारत फोर्ज, एबीबी इंडिया, बायोकॉन, सेल आणि अजंता फार्मा 1.5 ते 2.5 टक्के घसरत बंद झाले. स्मॉलकॅपमधील रुची सोया, एचओईसी, अदानी ट्रान्समिशन, कॅमलिन फाइन आणि गेटवे डिस्ट्रिपार्क्स हे समभाग 11.7 ते 8.3 टक्क्यांनी मजबूत झाले.

 

Related posts: