|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन

नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करत असल्याची घोषणा रविवारी केली. या नव्या पक्षाची लवकरच नोंदणी करणार असल्याचे नारायण राणेंनी सांगितले. मात्र, पक्ष स्थापनेनंतर एनडीएत सामील होण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी ही घोषणा केली. सर्व स्तरातील जनतेच्या विकासासाठी हा नवा पक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नव्या पक्षाची लवकरच नोंदणी करण्यात येणार असून, त्यानंतर निवडणूक चिन्ह, झेंडा याबाबतची माहिती जाहीर करणार असल्याचे राणेंनी सांगितले. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत राणेंनी कोणतेही वक्तव्य केले नाही. तसेच काँग्रेस आमदार आणि त्यांचे पुत्र नितेश राणे आणि त्यांचे समर्थक आमदार कोळंबकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान, यावेळी राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेची भूमिका दुतोंडी. उद्धव ठाकरेंना प्रतिस्पर्धी मानत नाही, असे नारायण राणे म्हणाले.