|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जीएसटीमुळे दसऱयाची खरेदी विक्री थंडावली

जीएसटीमुळे दसऱयाची खरेदी विक्री थंडावली 

प्रतिनिधी/ सोलापूर

वस्तू, सेवाकर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर खरेदीचा पहिला मोठा मुहूर्त दसरा आला मात्र दसऱयानिमित्त बाजारात होणारी कोटय़ावधीची उलाढाल यंदा जीएसटीमुळे थंडावली आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रातील व्यापाऱयांना बसला आहे. सोने खरेदीचा अपवाद वगळता वाहनविक्री, इलेक्ट्रॉनीक्स बाजारपेठातही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

   याशिवाय सप्नातील घरासाठी फ्लॅट व प्लॉटचेही काही प्रमाणात व्यवहार झाले. यासाठी अनेक बिल्डरांनी जीएसटी माफी देवून ग्राहकांना आकर्षित केले होते. परंतु, ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचेच चित्र होते. सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीचा फायदा झाल्याचा कितीही गवगवा केला असला तरी तरी या निर्णयामुळे मात्र प्रत्यक्षात फटका बसल्याची कबुली अनेक व्यापाऱयांनी दिली.

   साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱयानिमित्त नवीन वस्तू खरेदीची जुनी परंपरा असल्याने लोकांनी काहीतरी खरेदी करावी म्हणून  बाजारात फेरफटका मारल्याचे दिसून आले. सकाळी 10 वाजल्यापासून बाजारात रेलचेल होती, दुचाकी, चारचाकी शोरूमध्ये  गर्दी होती. मोबाईल, फ्रिज यासारख्या इलेक्ट्रॉनीक्स वस्तूंची दालनेही सज्ज होती. मात्र याला ग्राहकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. सराफ बाजारात काही अंशी व्यवहार झाले. गंठण, अंगठय़ा, राणीहार, लक्ष्मीहार, बिलवरी आदी वेगवेगळ्या दागिन्यांसाठी मागणी होती. सोलापुरात जवळपास पाचशेहुन अधिक सराफ असून त्यांच्याकडे कोटय़ावधीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. सोलापुरात व्हीआयपी रोडवरील पी.एन. गाडगीळ,  सराफ बाजारात गणेश रामचंद्र आपटे, शिंगवी ज्वेलर्स, रेवणकर ज्वेलर्स, दाजी पेठेत बिटला ज्वेलर्स आदीठिकाणी खरेदीस मोठय़ाप्रमाणात  गर्दी  झालेली होती. सोलापुरात शनिवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 30 हजार 200 रुपये इतका होता.

  सात रस्ता परिसरातील गांधी टीव्हीएस, अक्कलकोट रस्त्यावरील चव्हाण ऍटोमोबाईल्स, सरस्वती चौकातील लक्ष्मी ऑटोमोबाईल्स, जुळे सोलापुरातील लक्ष्मी ऑटोमोबाईल , एम्लायमेंट  चौकातील कायझन होंडा, सुझुकी शोरुममधून वाहनांची विक्री झाली.

                घरांचे दर उतरले

दसरा मुहूर्तावर नोंदणीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी घरांचे दर कमी केले आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला असून प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान ग्राहकांना आकर्षित करणारे ठरते आहे.

              गेल्यावर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी सोने खरेदी अधिक झाली

जीएसटी मुळ सराफ व्यापार थंडावला होता. व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. गेली तीन महिने व्यापाऱयांची निराशाच झाली. परंतु दसरा सणाने दिलासा दिला. गेल्या वर्षीपेक्षाही यंदाच्या वर्षी दसऱयानिमित्त मोठय़ाप्रमाणात खरेदी झाली.

   अक्षय शिंगवा, सराफ व्यापारी

          हिरोच्या एच एफ डिलेक्स, स्पेलेंडर या दुचाकींना सर्वाधिक पसंती 

ग्राहकांकडून हिरो कंपनीच्या दुचाकींना बाजारात सर्वाधिक मागणी असून त्यात एच् एफ डिलक्स  ही गाडी ग्राहकांना अधिक पसंतीला उतरली आहे. दसऱया निमित्त स्कूटरवर कंपनीने 6 हजार 500 रुपयांची घसघशीत सूट दिल्याने या गाडीचीही मागणी वाढली आहे. जीएसटीमुळे व नोटाबंदीमुळे यंदा उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.

         बजाजच्या दुचाकी गाडय़ा विक्रीत 30 टक्केने वाढ

पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वाधिक मायलेज देणारी म्हणून बजाजच्या दुचाकींना बाजारात अधिक मागणी आहे. नव्यानेच आलेल्या विक्रांत या मॉडेललासुध्दा ग्राहकांची चांगली पसंती आहे. कंपनीने दसरा व दिवाळीसाठी 1500 ते 2500 रुपयापर्यंत दिलेली फेस्टिव्हल डिस्काउंट ऑफर व विविध द्वितीय संस्थाकडून शून्य टक्के व्याजाने होणारे अर्थसाहय्य यामुळे ग्राहकांना दुचाकी घेणे सोपे झाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा विक्रीत 30 टक्के वाढ झाली असून पाचशेहून अधिक गाडय़ा विकल्या जातील.