|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » अमूलची ‘कॅमल मिल्क चॉकलेट्स’ दिपावलीपूर्वी बाजारात

अमूलची ‘कॅमल मिल्क चॉकलेट्स’ दिपावलीपूर्वी बाजारात 

 अमदाबाद / वृत्तसंस्था :

प्रसिद्ध ‘अमूल’ नाममूद्रेचे स्वामित्व हक्क प्राप्त सहकारी संस्था गुजरात का sऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) ऊंटणींच्या दूधापासून निर्मित चॉकलेट बाजारात आणणार आहे. दिपावलीपूर्वी ही ‘अमूल कॅमल मिल्क चॉकेलट्स’ बाजारात दाखल होणार असून अशा प्रकारची चॉकलेट तयार करणारी जीसीएमएमएफ ही पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.

दिपावलीपूर्वी ग्राहकांना ही चॉकलेट्स उपलब्ध होतील. अमूलच्या गुजरातमधील आणंदस्थित प्रकल्पात ही अमूल कॅमल चॉकलेट्स तयार करण्यात येणार आहे. यासाठी कच्छमधील सीमावर्ती भागातील दुग्धसंकलन केंद्रांकडून यासाठी दूधपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढी यांनी दिली. या प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता प्रतिमहिना 1 हजार टन इतकी असून पहिल्या टप्प्यात देशभरातील दोन लक्ष दुकांनात ही चॉकलेट्स विक्रीसाठी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार ऊंटणीचे दूध मानवासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात अनेक प्रकारचे औषधी तत्व असतात. मधूमेह, यकृत आणि मुत्रपिंडसंबंधी व्याधांवर हे दूध लाभकारक समजले जाते. तसेच या दुधामुळे प्रतिकारक्षमतेत देखील वाढ होते. मात्र ऊंटणीचे दूध हे लवकर खराब होत असल्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मापदंड प्राधिकरणाने गतवर्षीच फक्त विशिष्ट मापदंडांचे पालन करीत ऊंटणींच्या दुधापासून  निर्मिलेल्या पदार्थांच्या विक्रीस परवानगी दिली होती.

 

 

Related posts: