|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » एनकेजीएसबी सहकारी बॅंकेची शतकमहोत्सवी वाटचाल

एनकेजीएसबी सहकारी बॅंकेची शतकमहोत्सवी वाटचाल 

मुंबई / प्रतिनिधी :
एनकेजेएसबी सहकारी बँकेच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची सांगता 23 सप्टेंबर रोजी रविंद्र नाट्य़ मंदीर, प्रभादेवी येथे पार पडली. या सांगता समारंभाला नागालॅन्ड आणि अरूणाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल माननीय पी बी आचार्य प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. खासदार आणि सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री आनंदराव अडसूळ, एसआरएल रोगनिदान केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अनीता बोर्गेस (एमडी) आणि लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा देखील सन्मानीय अतिथीगणांत समावेश होता. बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळातील सदस्य आणि बँक कर्मचारीसहीत, समभागधारक, ग्राहक आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
भारतातील सर्वश्रेष्ठ 10 सहकारी बँकात समाविष्ट असलेल्या एनकेजीएसबी सहकारी बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री किशोर कुलकर्णी यांनी बँकेच्या या यशस्वी वाटचालीत बँकेशी संबंधित सर्व घटकांनी दिलेला पाठिंबा आणि दर्शविलेल्या विश्वासासाठी त्यांचे आभार मानले. कृत्यज्ञता व्यक्त करताना यशस्वीपूर्ण शतकपूर्ती ही सर्व घटकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढील पाच वर्षात एकूण उलाढाल 25,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असल्याचही यावेळी बँकेकडून सांगण्यात आले.

Related posts: