|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचऱयात 42 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

आचऱयात 42 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप 

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवाची सांगता

वार्ताहर / आचरा :

  ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आचरा किनाऱयावर गुरुवारी सायंकाळी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गेले 42 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. गणेश मूर्ती विसर्जन सोहळय़ास भाविकांचा जनसागर आचरा किनारी दाखल झाला होता.

  हजारो भाविकांच्या उपस्थितीत, सूर्य अस्ताला जात असताना ऐतिहासिक संस्थानकालीन थाटाची परंपरा जपणाऱया इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवातील मूर्तीचे विर्सजन करण्यात आले. रामेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता उत्तरपूजा आटोपून आरती झाल्यावर श्री गजानन महाराजांच्या ललकारीने श्रींच्या मूर्तीची विर्सजन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर आचरा रामेश्वर मंदिराकडून आचरा तिठा, भंडारवाडी, काझीवाडा, गाऊडवाडी व आचरा पिरावाडी अशी मिरवणूक हजारोंच्या लवाजम्यासह निघाली. या सोहळय़ात आचरा दशक्रोशीतील भाविकांसह कोल्हापूर, कराड, सातार, पुणे व गोव्यासह मुंबई येथील भाविकही उपस्थित होते.

  विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडावी म्हणून आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धुमाळे यांनी चोख नियोजन पेले. त्यामुळे वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी, सरबत व नाष्टय़ाची सोय करण्यात आली होती. परतीच्या प्रवासासाठी भाविकांना विनामोबदला वाहनसेवाही काही वाहन मालकांनी दिली.

स्थानिक बेंजो पथकांची सलामी ठरली आकर्षण

  या मिरवणुकीत प्रत्येक वाडीनुसार स्थानिक बेंजो पथकानी लयबद्ध सुरांची सलामी देत गणरायाचे स्वागत केले. मूर्ती विसर्जनप्रसंगी आचरा किनाऱयावरील वातावरण भावूक झाले होते.

Related posts: