|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » दूरसंचारमधील 1.5 लाख रोजगार संकटात

दूरसंचारमधील 1.5 लाख रोजगार संकटात 

क्षेत्रावर 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज

वृत्तसंस्था/ मुंबई

कर्जात बुडालेल्या दूरसंचार क्षेत्रासमोरील संकटांत वाढ होत आहे. या क्षेत्रातील कर्ज हे मोठे आव्हान असून यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 1.5 लाख रोजगार संकटात येण्याचा धोका आहे असे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

सध्या या क्षेत्राकडे 8 लाख कोटी रुपयांच कर्ज असून याव्यतिरिक्त काही कंपन्यांनी मोफत सेवा सुरू केल्याने त्याचा फटका या क्षेत्राला बसत आहे. या क्षेत्रातील संकटाची जाणी सरकारला आहे. यापूर्वीही सरकारने दखल घेतली होती. भविष्यात तसा प्रसंग पुन्हा निर्माण झाल्यास हस्तक्षेप करण्यात येईल. या क्षेत्रामुळे रोजगाराचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी इंडिया मोबाईल कॉग्रेंसमध्ये म्हटले आहे. एप्रिलमध्ये आरबीआयने कर्ज दिलेल्या व्यावसायिक बँकांना सूचना दिली होती. सध्या दूरसंचार क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आर्थिक तणाव निर्माण होत आहे आणि या क्षेत्रातील इंटरेस्ट रेशो एकापेक्षा कमी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आल्याने 20 हजार ते 25 हजार रोजगाराला धोका आहे. विलीनीकरण झाल्याने सध्याच्या कामाच्या प्रकारात बदल होण्याचा अंदाज आहे. व्होडाफोनबरोबर विलीनीकरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर आयडियाने 1,800 जणांना घरी पाठविले आहे. मार्चपर्यंत विलीनीकरण होत आणखी 5 हजार ते 6 हजार रोजगार संपण्याची शक्यता आहे. व्होडाफोननेही 1,400 रोजगार कमी केला आहे.

Related posts: