|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » राणेंना काँग्रेसने सडवले आता भाजप कुजवणार : सुभाष देसाई

राणेंना काँग्रेसने सडवले आता भाजप कुजवणार : सुभाष देसाई 

ऑनलाईन टीम / रत्नागिरी :

नारायण राणे यांना काँग्रेसने गेली बारा वर्षे सडवले. आता त्यांना भाजपवाले कुजवतील, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. तसेच सत्तेसमोर झुकणाऱया राणेंचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रत्नागिरी येथे शिवसेना पदाधिकाऱयांचा मेळावा झाला. त्यावेळी देसाई बोलत होते. ते म्हणाले, ज्या राणेंना सिंधुदुर्ग जिह्यात थारा नाही. त्यांनी भाजपला मिठी मारली. जो पक्ष सत्तेत आहे, त्याच्यापुढे लोटांगण घालायचे हे राणेंचे कामच आहे, अशा शब्दांत देसाई यांनी राणेंवर टीकास्त्र सोडले. तसेच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाची स्थापना केली. आता त्यांचा स्वाभिमान कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.