|Sunday, July 22, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » हे आहेत प्रसिद्ध भारतीय नोबेल विजेते

हे आहेत प्रसिद्ध भारतीय नोबेल विजेते 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून नोबेल समितीकडून विविध क्षेत्रांमधील लोकांच्या संशोधन आणि त्यांच्या कार्यबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. नोबेल पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पातळीचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. यापाशर्वभूमीवर आम्ही तुम्हाला प्रसिद्ध भारतीय नोबेल पुरस्कार विजेत्यांबद्दल सांगणार आहोत.

मदर तेरेसा :

मदर तेरेसा यांना 1979मध्ये नोबेल शांतता पुरस्कारने गौरवण्यात आले होते. त्यांनी आपले जीवन गरीबांच्या मदतीत समर्पीत केले होते.

आमर्त्य सेन :

आमर्त्य सेन यांना 1998मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. त्यांनी अनेक विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफसर म्हणून काम केले.

 वेंकटरामन रामकृष्णन :

वेंकटरामन हे केंब्रिज इंग्लंड येथील एका प्रयोगशाळेत काम करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत.2009मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले होते.

कैलाश सत्यार्थी :

कैलाश सत्यार्थी हे भारतीय बालहक्क चळवळकर्ते आहेत. त्यांना 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.

सी.व्ही. रमन :

सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रामन परिणाम या शोधासाठी ते ओळखले जातात. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले होते.

रवींद्रनाथ टागोर :

रवींद्रनाथ टागोर हे चित्रकार, नाटककार, कादंबरीकार , बंगाली कवी, संगीतकार होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्या व बंगाली संगीतात एक अमूलाग्र बदल घडून आला.रविंद्रनाथ हे भारताचे व अशियातील पहिले नोबेल विजेते होते. 1913मध्ये त्यांना साहित्यातला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

 

 

Related posts: