|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बडय़ा कार्यकर्त्यांचे अटकपुर्व जामिनासाठी अर्ज

बडय़ा कार्यकर्त्यांचे अटकपुर्व जामिनासाठी अर्ज 

प्रतिनिधी/ सातारा

आनेवाडी टोलनाक्यावरून झालेला राडा आता कार्यकर्त्यांच्या अंगलट येवू लागला आहे. एक दिवस तुमचा बाकी 364 दिवस आमचे हे पोलिसांचे वाक्य साताऱयात कार्यकर्त्यांचा मात्र चांगलाच खिस काढताना दिसत आहे. आपल्यावर अटकेची कारवाई नको म्हणुन नगरसेवक विनोद उर्फ बाळासाळेब खंदारे, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, विक्रम पवार या बडय़ा कार्यकर्त्यांनी सातारा न्यायालयात बुधवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु या अर्जावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवले असून याबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी दि. 13 रोजी होणार आहे.

आनेवाडी टोलनाक्यावरून सुरूचीमध्ये मध्यरात्री झालेल्या राडय़ाचे पडसाद काही केल्या कार्यकर्त्यांची पाठ सोडण्यास तयार नाही. पोलिसांनीही आरोपींची यादी लांबलचक बनवल्याने कार्यकर्त्यांना दिवाळी काही केल्या गोड जाणार नाही असे दिसत आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 14 आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे. अनेक कार्यकर्ते सध्या मोबाईल स्विच ऑफ करून सातारा शहरातुन परागंदा झालेले आहेत.

पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे व गोपनिय मा†िहती मिळवून आपल्याला कधीही पकडतील या भितीने परागंदा झालेले बडे कार्यकर्ते नगरसेवक बाळासाहेब खंदारे, जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, विक्रम पवार यांनी न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. परंतु न्यायालयाने या अर्जावर पोलिसांचे म्हणणे मागवले आहे. या आरोपींचे जामीन अर्ज ऍड. अरविंद कदम, ऍड. पराग जाधव, यांनी न्यायालयात सादर केले. या अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी दि. 13 रोजी होणार आहे.

दोनच दिवसांपुर्वी साताऱयात आय. जी विश्वास नांगरे- पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही. पळून-पळून कार्यकर्ते जाणार कुठे? असा प्रश्न करून काही केल्या त्यांना पोलीस सोडणार नाही असा इशाराच आय.जी नांगरे पाटीलांनी दिला आहे. बुधवारी एकही कार्यकर्ता पोलिसांच्या हाताला लागला नाही, परंतु पोलिसांचा तपास मात्र जोमाने सुरू आहे.