|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिक्षक बदली प्रक्रियात ‘खो-खो’

शिक्षक बदली प्रक्रियात ‘खो-खो’ 

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिह्यात तब्बल जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा अशा सुमारे सव्वा सहा हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्याकडे शिक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. असे असतानाच संवर्ग 1, संवर्ग 2 आणि संवर्ग 3 मधील शिक्षकांना एनआयसीकडूनच खो बसला होता. त्याची 888 शिक्षकांची पहिली यादी जाहीर करुन त्या यादीतील शिक्षकांना दि. 9 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. परंतु राज्य शासनानेच आता नव्याने मुदतवाढ देत दि. 12 पर्यंत दिली आहे.  त्यामुळे शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेतच शासनाचाच खो-खो सुरु असल्याचे दिसते. 

सातारा जिह्यात असलेल्या सुमारे 12 हजार प्राथमिक शिक्षकांपैकी सव्वा सहा हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीग्रस्त सध्या 16 शिक्षक जिह्यात आलेले आहेत. तर अजूनही 100 हून अधिक जण येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर जिल्हातर्गंत बदल्यासाठी अनेकांनी ऑनलाईन लॉगींनची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सगळय़ांच्या नजरा ही बदली प्रक्रिया कधी होईल याकडे लागल्या आहेत. असे असताना याच बदली प्रकियेत सं वर्ग 1, सं वर्ग 2 आणि सं वर्ग 3 यामधील ज्या शिक्षकांनी इच्छेप्रमाणे शाळांची मागणी केली होती. त्यापैकी जे बदलीप्राप्त शिक्षक आहेत, त्यांनी शाळा मागितल्यामुळे त्यांना एनआयसीकडूनच नोंदणीवेळी खो बसला होता. त्यामुळे पुन्हा अशा शिक्षकांना अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले हाते. सं वर्ग 4 साठी फार्म भरण्यासाठीची मुदत दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आली होती. जिल्हा परिषदेंकडून समानीकरणातंर्गत पदाची तसेच निव्वळ रिक्त पदांच्या प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये बरीच तफावत आढळून आली. त्यामुळे संबंधित जिह्यांना समानीकरणाच्या याद्या राज्य शासनाला अद्याप उपलब्धच करुन देता आल्या नाहीत. आता त्या दिल्या जात आहेत.

चौथ्या टप्यातील फॉर्म भरुन घेण्यासाठी दिलेली दि. 9 ऑक्टोबर मुदत आता गुरूवार 12 ऑक्टोबर सांयकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. सदर मुदतीत अर्ज भरण्याबाबत शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर शिक्षकांना अवगत करण्यात यावे, असे पत्रच पाठवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अगोदर झळवलेल्या 888 शिक्षकांच्या यादीच्या जाग्यावर नव्याने 940 जणांची यादी झळकवण्याचे कामकाज दुपारी सुरु होते. त्यामुळे या शिक्षकांना आता इंटरनेटवर जावून आपले अर्ज भरावे लागणार आहेत, असे चित्र निर्माण होणार आहे.

 

Related posts: