|Thursday, October 12, 2017
You are here: Home » Top News » यशवंत सिन्हा गद्दार, देशद्रोही : बाबुल सुप्रियो

यशवंत सिन्हा गद्दार, देशद्रोही : बाबुल सुप्रियो 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

यशवंत सिन्हा यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतल्यानंतर केंदीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी त्यांचा उल्लेख देशद्रोही, गद्दार असा केला आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरुन मोदी सरकारवर टीका करणाऱया सिन्हा यांच्यावर टीका होत आहे.

देशाच्या आर्थिक स्थितीवरुन यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. तसेच जय शहा यांच्या संपत्तीच्या मुद्यावरुनही सिन्हा यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सिन्हा यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. जय शहा प्रकरणात भाजपने आपली नैतिकता गमावली आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री त्यांच्या बचावासाठी उभे राहत आहेत. त्यावरुन डाळीत काहीतरी काळे असल्याचे सिद्ध होत आहे, अशी शंका यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केली होती. त्यानंतर आता केंदीय मंत्र्यांनी सिन्हा यांना देशद्रोही, गद्दार असे संबोधले आहे.

 

Related posts: