|Thursday, October 12, 2017
You are here: Home » leadingnews » भाजपाचा परतीचा प्रवास सुरू : अशोक चव्हाण

भाजपाचा परतीचा प्रवास सुरू : अशोक चव्हाण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नांदेड-वाघाळा महापालिकेचे सर्व निकाल हाती आले असून, काँग्रेसने तब्बल 71 जागांवर मुसंडी मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे भाजपाचा परतीचा प्रवास सुरू असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.

‘या निकालाद्वारे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांनी चोख उत्तर दिले आहे. खालच्या पातळीच्या प्रचाराचा जनतेने दणका दिला आहे. भाजपच्या खोटय़ा प्रचाराला नांदेडकरांनी धुडकावले असून, आता या पक्षाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे,’ असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला.

भाजपाने केवळ अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. मात्र, प्रत्यक्षात काही केले नाही. या पराभवातून त्यांनी योग्य तो धडा घ्यावा. काँग्रेसच अच्छे दिन आणू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Related posts: