|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुतगिरणीच्या फेडरेशनच्या ऍडव्हायजरी कमिटी सदस्यपदी फडणीस यांची निवड

सुतगिरणीच्या फेडरेशनच्या ऍडव्हायजरी कमिटी सदस्यपदी फडणीस यांची निवड 

प्रतिनिधी /आजरा :

अण्णाभाऊ आजरा तालुका सुतगिरणीचे कार्यकारी संचालक व वस्त्राsद्योगातील अनुभवी जाणकार व तज्ञ चंद्रशेखर फडणीस यांची अखिल भारतीय सुतगिरणी फेडरेशनच्या ऍडव्हायजरी कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली. या कमिटीमध्ये भारतातून सात जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये फडणीस यांचा समावेश आहे.

देशभरातील वस्त्राsद्योगासाठी भेडसावणाऱया विविध समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे, संस्थाना आर्थिक व तांत्रिक स्तरावरील कामगिरी सुधारण्याकरीता मार्गदर्शन करणे, देशातर्गंत व आंतराष्ट्रीय बाजारपेठेबाबत मार्गदर्शन, मुल्यवर्धीत करप्रणालीबाबत मार्गदर्शन, सदस्य संस्थाना प्रशिक्षण कार्यक्रम, सेमिनार्स आयोजित करण्यासाठी पुढाकार घेवून त्यांचा लाभ संस्थापर्यंत पोहचविणे अशी विविध प्रकारची कार्य या ऍडव्हायजरी कमिटीच्या माध्यमातून पार पाडली जात आहेत. सहकार क्षेत्रातील वस्त्रोद्योगासाठी मोठे योगदान या कमिटीचे राहणार आहे.

आजरा सुतगिरणीचे संस्थापक कै. काशिनाथ चराटी व कै. माधवराव देशपांडे यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार व संस्था प्रमुख अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली, सुतगिरणीच्या चेअरमन अन्नपुर्णा चराटी, व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, संचालक मंडळ, आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापनात तरबेज असणारे अधिकारी व कामगारांच्या सहकार्यातून फडणीस यांनी अल्पावधीत सुतगिरणीला यश मिळवून दिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट पुरस्कार, राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा सहकार निष्ठ पुरस्कार असे विविध पुरस्कार आजरा सुतगिरणी फडणीस यांनी मिळवून दिले आहेत.

आजऱयासारख्या ग्रामीण व दुर्गम भागात असलेल्या आण्णाभाऊ सूतगिरणीत महत्वाच्या पदावर कार्य करून सहकार चळवळ बळकट करण्यास हातभार लावून फडणीस यांनी आदर्श निर्माण केला आहे. ऑल इंडीया को-ऑप फेडरेशनने स्थापन केलेल्या ऍडव्हायजरी कमिटीच्या सदस्यपदी फडणीस यांची निवड झाल्याबद्दल आजरा सूतगिरणीच्या संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले.

Related posts: