|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा » हाँगकाँग स्पर्धेतून स्विटोलिनाची माघार

हाँगकाँग स्पर्धेतून स्विटोलिनाची माघार 

वृत्तसंस्था /हाँगकाँग :

युक्रेनची टॉप सीडेड महिला टेनिसपटू इलिना स्विटोलिनाने पायाला झालेल्या दुखापतीमुळे हाँगकाँग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्विटोलिनाच्या माघारीमुळे अमेरिकेच्या निकोली गिब्जला पुढील फेरीत चाल मिळाली आहे.

हाँगकाँग स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात स्विटोलिनाने कझाकस्तानच्या डियासचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱया फेरीत तिची लढत गिब्ज बरोबर आयोजित केली होती पण स्विटोलिनाच्या पायाला दुखापत झाल्याने तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Related posts: