|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बहिरेवाडी येथील जवान हुतात्मा

बहिरेवाडी येथील जवान हुतात्मा 

उत्तूर :

काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान प्रवीण तानाजी येलकर (वय 32, मूळ गाव बेगवडे, ता. भुदरगड, स्थानिक बहिरेवाडी, ता. आजरा) हुतात्मा झाले.

प्रविण यांच्या पश्चात पत्नी पूनम, चार वर्षांची मुलगी प्रांजल, वडील तानाजी, आई सौ. शालन यांच्यासह भाऊ व भावजय असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर बहिरेवाडीसह जिल्हय़ावर शोककळ पसरली आहे.

 प्रवणी येलकर हे गुरुवारी लष्करी वाहनातून लडाखवरून दारूगोळा घेऊन कारगिलकडे जात होते. त्यावेळी वाहनाला झालेल्या अपघातात येलकर हुतात्मा झाले. शुक्रवारी कोल्हापूर येथील मिलटरी कॅम्पमध्ये त्यांचे पार्थिव येईल. त्यानंतर दुपारी बहिरेवाडी येथे भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

                 बहिरेवाडीवर शोककळा

प्रवीण यांचे मूळगांव भुदरगड तालुक्यातील बेगवडे असले तरी त्यांचे बालपण बहीरेवाडी येथील मामा श्रीपती इंचनाळकर यांच्याकडे गेले. प्रविण यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे तर माध्यमिक शिक्षण बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये झाले. सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची त्यांची शालेय जीवनापासून इच्छा होती. शिक्षण पूर्ण होताच सुमारे 12 वर्षापूर्वी ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. मे महिन्यात लहान भावाच्या लग्नासाठी ते गावी बहिरेवाडी येथे आले होते. त्यांचे वडील तानाजी हे मुंबई महापालिकेच्या बेस्टमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी शालन व लहान मुलासह मुंबई येथे असतात. प्रवीण यांची पत्नी पूनम आपल्या चार वर्षांच्या मुलगी प्रांजल हिच्यासह गडहिंग्लज येथे राहतात. येलकर कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बहिरेवाडी येथेच स्थायिक झाले आहे. अतिशय मनमिळाऊ व खेळीमेळीचा स्वभाव असलेल्या प्रविण यांच्या निधनाची वार्ता बहिरेवाडी येथे समजताच बहिरेवाडीवर शोककळा पसरली आहे. आपल्या गावच्या लाडक्या जवानाचे पार्थिव गावी कधी येणार याकडे ग्रामस्थ डोळे लावून बसले आहेत.

Related posts: